न चुकणारा रोजचा बस प्रवास. आधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मग नोकरीच्या निमित्ताने रोज बस प्रवास घडतो. बस प्रवासातील रोजचा एक तास वाचनासाठी, दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी उपयोगी पडतो. पुण्याच्या बस (पी.एम.पी.एल) मध्ये डाव्या बाजूची अख्खी रांग 'महिलांसाठी राखीव' असल्यामुळे हल्ली हा प्रवास अधिक सुखकर झालाय. काही वर्षांपूर्वी हाच प्रवास नकोसा वाटायचा. रोज कोणाशी न कोणाशी तरी भांडण ते हि जागा मिळण्यासाठी नव्हे तर या छोट्याश्या बस प्रवासात शेजारी बसलेल्या पुरूष प्रवाश्याच्या विचित्र वर्तनामुळे. अगदी रोज नाही अधूनमधून कोणी तरी नमुना भेटायचा. सुरुवातीला कधी तरी अशा अनुभवला समोर जावं लागलं तेव्हा मी देखील इतर जणीसारखी नक्कीच घाबरले. त्या जागेवरून उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले. तात्पुरती त्या समस्येपासून पळवाट काढली. पण हे असं परत करू शकले नाही. थोडी हिम्मत दाखवून आवाज चढवून शेजारी बसलेल्या भामट्याला नीट बसायची ताकीद दिली. माझा चढलेला आवाज ऐकून तो माणूस असा काही घाबरला कि पुढच्या स्टोपवर उतरून निघून गेला. असे लपून छापून चाळे करताना लाज वाटत नाही पण सर्वांच्या देखत आपल्या सोज्वळ रूपाचा पंचनामा व्हायला नको या विचाराने घाबरून जातात. हे लक्षात येताच बस प्रवासात अशी कोणी व्यक्ती शेजारी बसल्यास न घाबरता पहिल्यांदा आवाज चढवून ( बाकीच्या सर्व प्रवाश्यांना ऐकायला जावं या उद्देशानेच) त्याला समज द्यायची एक चांगली युक्ती अंमलात आणायला सुरुवात केली.
काही दिवसात हे जाणवलं की हे फक्त माझ्याबाबतचं घडत नाहीये तर अनेकजणींना या अनुभवला सामोरं जावं लागतंय. पण बायका त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला बोलायला घाबरतात. आपण ओरडाआरडा केला तर सगळ्यांना समजेल आणि बाकीची लोकं आपल्यालाच नावं ठेवतील या विचाराने घाबरून जाऊन त्या शांत राहतात आणि शेजारी बसलेल्या पुरुष प्रवाश्याचा त्रास सहन करतात. एकदा बसमध्ये माझ्यासमोरच्या सीटवर एक महिला येउन बसली नंतर तिच्या शेजारी कोणी पुरुष प्रवासी येउन बसला. ती खिडकीत बसली होती. हळूहळू तो प्रवासी तिला इतका चिकटून बसला कि त्याच्या आणि तिच्यामध्ये थोडं अंतर राहावं यासाठी ती थोडी सरकून अंग चोरून बसली. तो माणूस आणखी चिकटून बसायला लागला. खिडकीच्या बाजूला बसलेली असल्यामुळे ती त्या माणसापासून स्वतःला आणखी वेगळं ठवू शकत नव्हती. मी मागच्याच सीटवर बसलेली असल्यामुळे मला तिची अगतिकता लक्षात येत होती. शेवटी न राहवून मीच त्या माणसाला बोलले. मी बोलतेय हे बघितल्यावर त्या महिलेनेही त्या माणसाला बोलायला सुरुवात केली. आमच्या दोघींनाही तो घाबरला उठून पुढे ड्रायव्हरपाशी जाऊन उभा राहिला. तो निघून गेल्यावर हि महिला माझ्याशी बोलू लागली. ' बरं झालं तुम्ही बोललात ते, मी खूप घाबरून गेले होते. कळत नव्हतं काय करायचं ते. पण तुम्ही त्याला बोलताय हे बघून मला ही जर धीर मिळाला. ' वैगरे वैगरे… पण हे खरंय कि अशा प्रसंगांमध्ये महिला घाबरून जातात. बाकीचे प्रवासी काय म्हणतील. बसमध्ये आपल्या ओळखीचं कोणी असेल तर ते काय म्हणतील असा उलटा विचार करतात. त्यामुळे आधी स्वतःसाठी मग प्रवासातील इतर महिलांसाठी अधूनमधून भांडण्याची वेळ येऊ लागली.
या रोजच्या असल्या भांडणाचा रोजच्या कामावरही परिणाम होऊ लागला. कोण कुठला माणूस प्रवासात आपल्या शेजारी बसतो आणि त्या थोड्या वेळात ही तो आपल्याशी असभ्य वर्तन करू पाहतो, आपला गैरफायदा घेऊ पाहतो या विचाराने अधिक त्रास होऊ लागला. हा बस प्रवास टाळता येणारा नसल्यामुळे या समस्येला योग्य पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे असं वाटू लागलं आणि बस प्रवास टाळणं म्हणजे या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतली तरी अन्य महिलांची त्यातून सुटका नव्हतीच तात्पुरती पळवाट काढण्यापेक्षा काही तरी कायमचा उपाय करण्याची गरज वाटत होती. याच काळात परत कोणां महिलेसाठी परत एकदा बस मध्ये भांडले. पण त्याचा मलाच इतका त्रास झाला कि पुढचा सगळा दिवस उगाच त्रागा करण्यात गेला. ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेस बसमध्ये त्या महिलेबाबत घडलेला प्रसंग माझ्या अन्य सहकाऱ्यानां सांगत होते. आमच्या संस्थेचे डायरेक्टर यशवंत ठकारही आमच्या बरोबर होते. आपण परिवहन मंडळाच्या अध्यक्षांना भेटून त्यांना या समस्येवर तोडगा काढायला सांगू या असं आमच्या सरांनी बोलून दाखवलं. मी तिथे जाऊन बोलण्यात कोणतीच अडचण वाटत नव्हती फक्त मी माझ्याबाबत बोलू शकत होते इतर महिलांचं काय? माझ्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ते असं घडतंय याचे पुरावे मागतील ते कसे मी त्यांना देऊ शकणार… असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.
आमची संस्था संशोधनाच्या कामात गेले अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे संशोधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हेक्षणाची कामं आमची संस्था करते.
याच सर्व्हेक्षणाच्या कामावरून मला एक गोष्ट सुचली. या समस्येबाबत पुण्यातील महिलांशी बोलावं. म्हणजे समस्येवर एक सर्व्हे करून या समस्येची तीव्रता आकडेवारीच्या रुपात मांडली तर प्रशासनावर त्याचा परिणाम अधिक होऊ शकेल. या कामासाठी आमचं ऑफिस पाठीशी उभं राहिलं.
एक प्रश्नावली तयार करून महिलांशी त्यावर चर्चा करायचं ठरलं. ज्या महिला नियमितपणे बस प्रवास करतात अशांशी चर्चा करून त्यांची प्रश्नावली भरून घ्यायची असं ठरलं. तरी यात काही तरी महत्वाचं राहतंय असं वाटतं होतं आणि ते म्हणजे शाळेसाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज बस करणाऱ्या विध्यार्थिनी यांचा सहभाग. त्यांच्याशी स्वतन्त्रपणे चर्चा करण्याचे ठरले. साधारणपणे एक महिनाभर आम्ही पुण्यातील रोज प्रवास करणाऱ्या महिला आणि बसने शाळेत - महाविद्यालयात जाणर्या मुलींशी बोलत होतो. दीड ते दोन हजार महिला आणि मुलींशी याकाळात संवाद साधला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधी हि या समस्येवर न बोलणाऱ्या महिला मोकळेपणाने बोलत होत्या, चांगल्या उपाययोजना सुचवत होत्या.
पुणे शहरातील काही शाळा आम्ही सर्व्हेसाठी निवडल्या होत्या. या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्यासाठी गेले होते. ज्या मुली रोज बस प्रवास करतात त्या सर्वांना एका वर्गात एकत्र केलं होतं. मुलींनी मोकळेपणाने बोलावं यासाठी त्यांच्या शिक्षिका ही तिथे थांबल्या नाही. वर्ग गच्च भरलेला होता चौथी पासून ते दहावी इयत्तेतील विद्यार्थिनी त्या वर्गात एकत्र बसल्या होत्या. यांना बोलतं करण्यासाठी आधी मी मला बस प्रवासात येणारे अनुभव त्यांना सांगू लागले. मी बोलत असतना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे बदलतायत हे ही हळूच टीपत होते. मी एखादं उदाहरण सांगत असताना मुली हळूच आपल्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीकडे बघायच्या जणू काही त्यानाही असा अनुभव आला होता. माझाबोळून झाल्यावर त्यानाही बोलायला सांगितलं. बराच वेळ शांतता होती. पण चुळबुळ सुरु होती. बोलावं कि बोलू नये अशी त्यांची अवस्था लक्षात येत होती. बराच वेळा नंतर एक मुलगी धीर करून बोलू लागली. तिचं बघून अजून एकजण बोलली आणि हळूहळू अनेकजणी बोलत्या झाल्या. बिलकुल वाटल नव्हतं इतक्या मुली मोकळेपणाने बोलल्या. रोजच्या बस प्रवासात या चिमुरड्या मूलीनाही पुरुष प्रवाशांकडून अनेक प्रकारचे वाईट अनुभव आले होते. दप्तराचे ओझे सांभाळत बसच्या गर्दीत चढताना अनेकांच्या हातांनी त्यांच्या शरीराला स्पर्श केला होता. या चिमुरड्या त्या माणसाला बोलणार तरी कशा. चौथी मध्ये जाणारी एक चिमुरडी सांगत होती, ' एकदा बस मध्ये खूप गर्दी होती. मला उशीर झाला होता म्हणून मी त्या बसमध्ये चढले. माल एका काकांनी त्यांच्या मांडीवर बसायला सांगितलं. मी नको म्हणाले त्यांनी खूपच आग्रह केला तरी मी नको म्हणाले. तर त्यांनी माझ्या हाताला धरून मला त्यांच्या मांडीवर बसवलं. त्यांचा हात बाकीच्या कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने माझ्या शरीरावर फिरत होता. मला कसंतरी वाटू लागलं मी त्यांच्या माडीवरून उतारले आणि घाबरून एकदम दारात जाऊन थांबले.' एवढ्याशा छोट्या मुलीलाहि न सोडणारे नराधम मी हि बस प्रवासात बघितले होते.
मुलींची एक अडचण होती कि आपण जर हे सगळा घरी सांगितलं तर आई - वडील आपल्यालाच ओरडतील. आपल्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? असं त्यांना वाटतं. पण या सर्व्हेच्या निमित्ताने त्याही बोलत्या झाल्या. त्यांनी सांगितलेले अनुभव केसस्टडी म्हणून वापरले. या सर्व्हेमध्ये नियमित बस प्रवास करणाऱ्या ८८ % मुलीनी या प्रवासादरम्यान आपलं लैंगिक शोषण होतं असं सांगितलं.
महिलांचही तेवढंच प्रमाण होतं.
सर्व्हेनंतर पुण्यातील असंख्य महिलांचे अनुभव माझ्याजवळ होते. त्यावर आधारित एक अहवाल ही तयार केला. आता या प्रश्नाला वाचा फोडण्याची गरज होती. पुण्यातील पत्रकारसंघाच्या मदतीने याविषयावर एक चर्चासत्र ठेवलं ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाचे अध्यक्ष अन्य अधिकारी यांना हि बोलावलं, प्रत्यक्ष बस प्रवास करणाऱ्या महिलाही या चर्चेत सहभागी झाल्या. मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, ज्येष्ठ पत्रकार सुजाता देशमुख यादेखील य विषयाची एक वेगळी बाजू - त्याचे परिणाम मांडण्यासाठी चर्चेत सहभागी झाल्या यासगळ्याचा एक चांगला परिणाम साधला गेला. परिवहन मंडळाच्या अध्यक्षांनी या चर्चेतच बसमधील अख्खी एक बाजू महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे घोषित केलं. दुसर्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रात याची दखल घेण्यात आली. हळूहळू यावर पुरुष प्रवाशांकडून उलटसुलट चर्चा होऊ लागली. या सगळ्यामध्ये पुण्यातील महिला संघटनानी हा विषय लावून धरला. महिलाही बोलू लागल्या यासगळ्याचा परिणाम म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या पी.एम.पी.एल. बस मध्ये महिला प्रवासीसाठी मिळालेले आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी झाला. महिलांना प्रवासात असा अनुभव येऊ नये. त्यानाही बसमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी हे आरक्षण दिलं गेलं. पुण्यातील सर्व महिलांनी हा विषय लावून धरला. परिणाम पुण्यात आज महिला सुरक्षितपणे बस प्रवास करू शकतात. अगदीच सगळ्याच बस मध्ये हे आरक्षण तंतोतंत पाळल जातंच असं होत नाही. पण महानगरपालिकेने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला. या सर्व्हेच्या दरम्यान आलेले खूप सारे अनुभव आहेत जे इथे शब्द संख्येच्या मर्यादेमुळे मांडता आले नाहीत. एखाद्या सामाजिक प्रश्नाला सर्व स्तरावर योग्य पद्धतीने सकारात्मकरीत्या पाठींबा मिळाला तर ती समस्या दूर होण्यासाठी काही न काही चांगली उपाय योजना करता येऊ शकते हे या प्रकारच्या उदाहरणामुळे सिद्ध झालं. Monday, May 6, 2013
सामुहिक कृतीतून महिलांना मिळाले आरक्षण
न चुकणारा रोजचा बस प्रवास. आधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मग नोकरीच्या निमित्ताने रोज बस प्रवास घडतो. बस प्रवासातील रोजचा एक तास वाचनासाठी, दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी उपयोगी पडतो. पुण्याच्या बस (पी.एम.पी.एल) मध्ये डाव्या बाजूची अख्खी रांग 'महिलांसाठी राखीव' असल्यामुळे हल्ली हा प्रवास अधिक सुखकर झालाय. काही वर्षांपूर्वी हाच प्रवास नकोसा वाटायचा. रोज कोणाशी न कोणाशी तरी भांडण ते हि जागा मिळण्यासाठी नव्हे तर या छोट्याश्या बस प्रवासात शेजारी बसलेल्या पुरूष प्रवाश्याच्या विचित्र वर्तनामुळे. अगदी रोज नाही अधूनमधून कोणी तरी नमुना भेटायचा. सुरुवातीला कधी तरी अशा अनुभवला समोर जावं लागलं तेव्हा मी देखील इतर जणीसारखी नक्कीच घाबरले. त्या जागेवरून उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले. तात्पुरती त्या समस्येपासून पळवाट काढली. पण हे असं परत करू शकले नाही. थोडी हिम्मत दाखवून आवाज चढवून शेजारी बसलेल्या भामट्याला नीट बसायची ताकीद दिली. माझा चढलेला आवाज ऐकून तो माणूस असा काही घाबरला कि पुढच्या स्टोपवर उतरून निघून गेला. असे लपून छापून चाळे करताना लाज वाटत नाही पण सर्वांच्या देखत आपल्या सोज्वळ रूपाचा पंचनामा व्हायला नको या विचाराने घाबरून जातात. हे लक्षात येताच बस प्रवासात अशी कोणी व्यक्ती शेजारी बसल्यास न घाबरता पहिल्यांदा आवाज चढवून ( बाकीच्या सर्व प्रवाश्यांना ऐकायला जावं या उद्देशानेच) त्याला समज द्यायची एक चांगली युक्ती अंमलात आणायला सुरुवात केली.
काही दिवसात हे जाणवलं की हे फक्त माझ्याबाबतचं घडत नाहीये तर अनेकजणींना या अनुभवला सामोरं जावं लागतंय. पण बायका त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला बोलायला घाबरतात. आपण ओरडाआरडा केला तर सगळ्यांना समजेल आणि बाकीची लोकं आपल्यालाच नावं ठेवतील या विचाराने घाबरून जाऊन त्या शांत राहतात आणि शेजारी बसलेल्या पुरुष प्रवाश्याचा त्रास सहन करतात. एकदा बसमध्ये माझ्यासमोरच्या सीटवर एक महिला येउन बसली नंतर तिच्या शेजारी कोणी पुरुष प्रवासी येउन बसला. ती खिडकीत बसली होती. हळूहळू तो प्रवासी तिला इतका चिकटून बसला कि त्याच्या आणि तिच्यामध्ये थोडं अंतर राहावं यासाठी ती थोडी सरकून अंग चोरून बसली. तो माणूस आणखी चिकटून बसायला लागला. खिडकीच्या बाजूला बसलेली असल्यामुळे ती त्या माणसापासून स्वतःला आणखी वेगळं ठवू शकत नव्हती. मी मागच्याच सीटवर बसलेली असल्यामुळे मला तिची अगतिकता लक्षात येत होती. शेवटी न राहवून मीच त्या माणसाला बोलले. मी बोलतेय हे बघितल्यावर त्या महिलेनेही त्या माणसाला बोलायला सुरुवात केली. आमच्या दोघींनाही तो घाबरला उठून पुढे ड्रायव्हरपाशी जाऊन उभा राहिला. तो निघून गेल्यावर हि महिला माझ्याशी बोलू लागली. ' बरं झालं तुम्ही बोललात ते, मी खूप घाबरून गेले होते. कळत नव्हतं काय करायचं ते. पण तुम्ही त्याला बोलताय हे बघून मला ही जर धीर मिळाला. ' वैगरे वैगरे… पण हे खरंय कि अशा प्रसंगांमध्ये महिला घाबरून जातात. बाकीचे प्रवासी काय म्हणतील. बसमध्ये आपल्या ओळखीचं कोणी असेल तर ते काय म्हणतील असा उलटा विचार करतात. त्यामुळे आधी स्वतःसाठी मग प्रवासातील इतर महिलांसाठी अधूनमधून भांडण्याची वेळ येऊ लागली.
या रोजच्या असल्या भांडणाचा रोजच्या कामावरही परिणाम होऊ लागला. कोण कुठला माणूस प्रवासात आपल्या शेजारी बसतो आणि त्या थोड्या वेळात ही तो आपल्याशी असभ्य वर्तन करू पाहतो, आपला गैरफायदा घेऊ पाहतो या विचाराने अधिक त्रास होऊ लागला. हा बस प्रवास टाळता येणारा नसल्यामुळे या समस्येला योग्य पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे असं वाटू लागलं आणि बस प्रवास टाळणं म्हणजे या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतली तरी अन्य महिलांची त्यातून सुटका नव्हतीच तात्पुरती पळवाट काढण्यापेक्षा काही तरी कायमचा उपाय करण्याची गरज वाटत होती. याच काळात परत कोणां महिलेसाठी परत एकदा बस मध्ये भांडले. पण त्याचा मलाच इतका त्रास झाला कि पुढचा सगळा दिवस उगाच त्रागा करण्यात गेला. ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेस बसमध्ये त्या महिलेबाबत घडलेला प्रसंग माझ्या अन्य सहकाऱ्यानां सांगत होते. आमच्या संस्थेचे डायरेक्टर यशवंत ठकारही आमच्या बरोबर होते. आपण परिवहन मंडळाच्या अध्यक्षांना भेटून त्यांना या समस्येवर तोडगा काढायला सांगू या असं आमच्या सरांनी बोलून दाखवलं. मी तिथे जाऊन बोलण्यात कोणतीच अडचण वाटत नव्हती फक्त मी माझ्याबाबत बोलू शकत होते इतर महिलांचं काय? माझ्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ते असं घडतंय याचे पुरावे मागतील ते कसे मी त्यांना देऊ शकणार… असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.
आमची संस्था संशोधनाच्या कामात गेले अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे संशोधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हेक्षणाची कामं आमची संस्था करते.
याच सर्व्हेक्षणाच्या कामावरून मला एक गोष्ट सुचली. या समस्येबाबत पुण्यातील महिलांशी बोलावं. म्हणजे समस्येवर एक सर्व्हे करून या समस्येची तीव्रता आकडेवारीच्या रुपात मांडली तर प्रशासनावर त्याचा परिणाम अधिक होऊ शकेल. या कामासाठी आमचं ऑफिस पाठीशी उभं राहिलं.
एक प्रश्नावली तयार करून महिलांशी त्यावर चर्चा करायचं ठरलं. ज्या महिला नियमितपणे बस प्रवास करतात अशांशी चर्चा करून त्यांची प्रश्नावली भरून घ्यायची असं ठरलं. तरी यात काही तरी महत्वाचं राहतंय असं वाटतं होतं आणि ते म्हणजे शाळेसाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज बस करणाऱ्या विध्यार्थिनी यांचा सहभाग. त्यांच्याशी स्वतन्त्रपणे चर्चा करण्याचे ठरले. साधारणपणे एक महिनाभर आम्ही पुण्यातील रोज प्रवास करणाऱ्या महिला आणि बसने शाळेत - महाविद्यालयात जाणर्या मुलींशी बोलत होतो. दीड ते दोन हजार महिला आणि मुलींशी याकाळात संवाद साधला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधी हि या समस्येवर न बोलणाऱ्या महिला मोकळेपणाने बोलत होत्या, चांगल्या उपाययोजना सुचवत होत्या.
पुणे शहरातील काही शाळा आम्ही सर्व्हेसाठी निवडल्या होत्या. या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्यासाठी गेले होते. ज्या मुली रोज बस प्रवास करतात त्या सर्वांना एका वर्गात एकत्र केलं होतं. मुलींनी मोकळेपणाने बोलावं यासाठी त्यांच्या शिक्षिका ही तिथे थांबल्या नाही. वर्ग गच्च भरलेला होता चौथी पासून ते दहावी इयत्तेतील विद्यार्थिनी त्या वर्गात एकत्र बसल्या होत्या. यांना बोलतं करण्यासाठी आधी मी मला बस प्रवासात येणारे अनुभव त्यांना सांगू लागले. मी बोलत असतना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे बदलतायत हे ही हळूच टीपत होते. मी एखादं उदाहरण सांगत असताना मुली हळूच आपल्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीकडे बघायच्या जणू काही त्यानाही असा अनुभव आला होता. माझाबोळून झाल्यावर त्यानाही बोलायला सांगितलं. बराच वेळ शांतता होती. पण चुळबुळ सुरु होती. बोलावं कि बोलू नये अशी त्यांची अवस्था लक्षात येत होती. बराच वेळा नंतर एक मुलगी धीर करून बोलू लागली. तिचं बघून अजून एकजण बोलली आणि हळूहळू अनेकजणी बोलत्या झाल्या. बिलकुल वाटल नव्हतं इतक्या मुली मोकळेपणाने बोलल्या. रोजच्या बस प्रवासात या चिमुरड्या मूलीनाही पुरुष प्रवाशांकडून अनेक प्रकारचे वाईट अनुभव आले होते. दप्तराचे ओझे सांभाळत बसच्या गर्दीत चढताना अनेकांच्या हातांनी त्यांच्या शरीराला स्पर्श केला होता. या चिमुरड्या त्या माणसाला बोलणार तरी कशा. चौथी मध्ये जाणारी एक चिमुरडी सांगत होती, ' एकदा बस मध्ये खूप गर्दी होती. मला उशीर झाला होता म्हणून मी त्या बसमध्ये चढले. माल एका काकांनी त्यांच्या मांडीवर बसायला सांगितलं. मी नको म्हणाले त्यांनी खूपच आग्रह केला तरी मी नको म्हणाले. तर त्यांनी माझ्या हाताला धरून मला त्यांच्या मांडीवर बसवलं. त्यांचा हात बाकीच्या कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने माझ्या शरीरावर फिरत होता. मला कसंतरी वाटू लागलं मी त्यांच्या माडीवरून उतारले आणि घाबरून एकदम दारात जाऊन थांबले.' एवढ्याशा छोट्या मुलीलाहि न सोडणारे नराधम मी हि बस प्रवासात बघितले होते.
मुलींची एक अडचण होती कि आपण जर हे सगळा घरी सांगितलं तर आई - वडील आपल्यालाच ओरडतील. आपल्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? असं त्यांना वाटतं. पण या सर्व्हेच्या निमित्ताने त्याही बोलत्या झाल्या. त्यांनी सांगितलेले अनुभव केसस्टडी म्हणून वापरले. या सर्व्हेमध्ये नियमित बस प्रवास करणाऱ्या ८८ % मुलीनी या प्रवासादरम्यान आपलं लैंगिक शोषण होतं असं सांगितलं.
महिलांचही तेवढंच प्रमाण होतं.
सर्व्हेनंतर पुण्यातील असंख्य महिलांचे अनुभव माझ्याजवळ होते. त्यावर आधारित एक अहवाल ही तयार केला. आता या प्रश्नाला वाचा फोडण्याची गरज होती. पुण्यातील पत्रकारसंघाच्या मदतीने याविषयावर एक चर्चासत्र ठेवलं ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाचे अध्यक्ष अन्य अधिकारी यांना हि बोलावलं, प्रत्यक्ष बस प्रवास करणाऱ्या महिलाही या चर्चेत सहभागी झाल्या. मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, ज्येष्ठ पत्रकार सुजाता देशमुख यादेखील य विषयाची एक वेगळी बाजू - त्याचे परिणाम मांडण्यासाठी चर्चेत सहभागी झाल्या यासगळ्याचा एक चांगला परिणाम साधला गेला. परिवहन मंडळाच्या अध्यक्षांनी या चर्चेतच बसमधील अख्खी एक बाजू महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे घोषित केलं. दुसर्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रात याची दखल घेण्यात आली. हळूहळू यावर पुरुष प्रवाशांकडून उलटसुलट चर्चा होऊ लागली. या सगळ्यामध्ये पुण्यातील महिला संघटनानी हा विषय लावून धरला. महिलाही बोलू लागल्या यासगळ्याचा परिणाम म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या पी.एम.पी.एल. बस मध्ये महिला प्रवासीसाठी मिळालेले आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी झाला. महिलांना प्रवासात असा अनुभव येऊ नये. त्यानाही बसमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी हे आरक्षण दिलं गेलं. पुण्यातील सर्व महिलांनी हा विषय लावून धरला. परिणाम पुण्यात आज महिला सुरक्षितपणे बस प्रवास करू शकतात. अगदीच सगळ्याच बस मध्ये हे आरक्षण तंतोतंत पाळल जातंच असं होत नाही. पण महानगरपालिकेने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला. या सर्व्हेच्या दरम्यान आलेले खूप सारे अनुभव आहेत जे इथे शब्द संख्येच्या मर्यादेमुळे मांडता आले नाहीत. एखाद्या सामाजिक प्रश्नाला सर्व स्तरावर योग्य पद्धतीने सकारात्मकरीत्या पाठींबा मिळाला तर ती समस्या दूर होण्यासाठी काही न काही चांगली उपाय योजना करता येऊ शकते हे या प्रकारच्या उदाहरणामुळे सिद्ध झालं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment